Table of Contents
ToggleDo we really need water Purifier? खरंच Water Purifier ची गरज आहे का?
प्रत्येक कुटुंब प्रमुखाला हा प्रश्न भेडसावत असेलचं आणि खरंच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का? आम्ही तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता मूळ मुद्द्याकडे वळू.
वॉटर प्युरिफायरचं काम आहे पाणी शुद्ध करणे म्हणजे सर्वात पहिले सध्या आपण जे पाणी पितोय ते शुद्ध आहे कि नाही हे तपासलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणे असे आहे कि आजपर्यंत हेच पाणी पितोय कोणताही आजार नाही मग प्युरिफायर कशाला? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच आम्हाला खाली दिलेल्या कंमेन्ट बॉक्स मध्ये द्याल अशी अपेक्षा करतो.
आपण सध्या जे पाणी पितोय ते शुद्ध आहे कि नाही?
आपले पाण्याचे स्रोत कोणते आहेत? –
बऱ्याच लोकांपर्यंत पिण्याचे पाणी हे महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत ह्यामार्फत केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याने होत असते तर काही कुटुंबांना मुबलक पाणी मिळत नसल्याने ते बोअरवेल, विहीर ह्यातून मिळालेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा उपयोग करत असतात.
पाणी शुद्ध कि अशुद्ध हे कसे समजते? पाणी दूषित आहे कि नाही हे शोधण्यासाठी पाण्यातील जैविक (Biological), रासायनिक (Chemical) आणि भौतिक (Physical) दूषिते (contaminants) शोधणे गरजेचे आहे
Biological contaminants (जैविक दूषिते) :
जैविक दूषिते हि पाण्यात आढळणारी सर्वात धोकादायक दूषिते मानली जातात. ह्यामध्ये जिवाणू (बॅक्टरीया), विषाणू (व्हायरस), प्रोटोझोव्हा, परजीवी (प्यारासाइट्स) इ. चा समावेश होतो.
Physical Contaminants (भौतिक दूषिते): पाण्यात आढळणारी माती हे भौतिक दूषिताचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. तसेच गाळ आणि इतर घाण पदार्थांचे कण ह्यांचा समावेश भौतिक दूषितांमध्ये होत असतो.
Chemical contaminants (रासायनिक दूषिते): पाण्यात अत्यंत धोकादायक असे रासायनिक घटक असतात त्यांना आपण TDS म्हणजेच Total Dissolved Solids असे संबोधतो. खरे तर भौतिक दूषितांचाही समावेश TDS मध्ये होतो.
TDS (Total Dissolved Solids) म्हणजे काय ?
Total Dissolved Solids म्हणजेच पाण्यात पूर्णपणे केंद्रीकरण झालेले पदार्थ. TDS बनलेला असतो अजैविक क्षार (Inorganic salts) आणि जैविक पदार्थांपासून ( Organic Matter). सामान्यतः पाण्यात असलेले क्षार हे धनभारित विद्युत कण जसे कि कॅल्शियम , मॅग्नेशियम , पोटॅशियम आणि सोडियम इ. आणि ऋण विद्युत भारित कण जसे कि कार्बोनेट्स , नायट्रेट्स , बायकार्बोनेट्स , क्लोराइड्स आणि सल्फेट्स इ.
हे पदार्थ पाण्यात कसे विरघळतात/आढळतात?
हे पदार्थ किंवा खनिजे ह्यांची मूळ स्रोत अनेक प्रकारची आहेत पण हे पाण्यात दोन वेगवेगळ्या पद्धतीने आढळू शकतात.
नैसर्गिक पद्धतीने
किंवा
मानवाच्या तयार केलेल्या क्रियांमुळे.
जमिनीत असलेले क्षार पाण्यात नैसर्गिकरित्या मिसळतात किंवा मानवी क्रिया जसे नदी, तलाव किंवा पाण्याच्या साठ्यात सोडलेले रसायनयुक्त पाणी किंवा शेतीत वापरलेले रासायनिक खते किंवा शहरातील सोडलेले सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी इ.
आता प्रश्न येतो कि पाण्यातील हा TDS मोजायचा कसा?
TDS मोजण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपनीचे TDS meter मिळतील पण आम्ही तुम्हाला उत्तम गुणवत्ता आणि अगदी योग्य दरात घरपोच मिळेल अश्या TDS meter ची शिफारस करतो त्याची LINK तुम्हाला देत आहे.
Do we really need water Purifier? खरंच Water Purifier ची गरज आहे का?
आता आपण परत मूळ प्रश्नावर येऊ या! (Do we really need water purifier?) खरंच आपल्याला वॉटर प्युरिफायरची गरज आहे का? आणि असल्यास आपण कोणते वॉटर प्युरिफायर निवडावे?
वॉटर प्युरीफायर उत्पादक जैविक दूषिते काढून टाकण्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट तंत्रज्ञानाचा (UV Technology) वापर करतात, तर भौतिक दूषिते पाण्यातून काढून टाकण्यासाठी आपल्या पूर्वजांनी तसेच आजही आपण वापरत असलेल्या गाळणी पद्धतीचा म्हणजेच माती काढून टाकण्यासाठीच्या पद्धतीचा वापर करतात.
रासायनिक दूषिते काढून टाकण्यासाठी RO म्हणजेच उलट द्रवभिसरण (Reverse Osmosis) पद्धतीचा वापर करतात.
तुम्ही वापरत असलेले पिण्याचे पाणी कोणतेही असले तरी त्यातले जैविक आणि भौतिक दूषिते काढून टाकण्यासाठी गाळणी पद्धत आणि UV अल्ट्रा व्हायोलेट तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. रासायनिक दूषिते काढून टाकण्यासाठी पाण्याचा TDS तीनशे पेक्षा जास्त असेल तर RO तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आम्ही शिफारस करतो पण RO तंत्रज्ञानाने काढून टाकण्यात आलेल्या पण मानवीय शरीराला गरजेच्या असणाऱ्या खनिजांना पुंन्हा पाण्यात टाकण्यासाठी Mineral Cartridge आपल्या प्युरिफायर मध्ये बसवायला विसरू नका.
आपण सेवन करत असलेले पाणी तपासून पहा. आपल्या पाण्याचा TDS किती आहे आणि त्यानुसार आपल्या कुटुंबाला कोणत्या प्रकारच्या वॉटर प्युरिफायरची गरज आहे ते ओळखा. जर तुम्हाला तुम्हाला वॉटर प्युरिफायर निवडताना अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, पाण्यात TDS पातळीची वरची मर्यादा 500 ppm आहे. डब्ल्यूएचओने शिफारस केलेली टीडीएस पातळी मात्र ३०० पीपीएम आहे
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS चा रिपोर्ट खालील लिंक वर जाऊन बघू शकतात
वॉटर प्युरिफायर कसे निवडावे ह्या बद्दलचा लेख वाचण्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Do we really need water Purifier? खरंच Water Purifier ची गरज आहे का? हा प्रश्न मुळीच विचारात घेऊ नका जर आपल्या पाण्याचा टीडीएस ३०० पेक्षा जास्त असेल. याउलट ज्या आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना याबाबत माहिती नसेल त्यांना हि पोस्ट share करा आणि अधिक माहितीसाठी ह्या ब्लॉग वरील इतर लिंक्स वर जाऊन योग्य माहिती मिळवा
आशा करतो कि तुमच्या महत्वाच्या प्रश्नच अर्थात Do we really need water Purifier? खरंच Water Purifier ची गरज आहे का? च उत्तर मिळायला सुरुवात झाली असेल