Skip to content

(RO waste water uses) RO प्रकियेमुळे वाया जाणारे पाणी पुन्हा वापरण्याचे नाविन्यपूर्ण प्रकार

RO waste water uses
(RO waste water uses) RO प्रकियेमुळे वाया जाणारे पाणी पुन्हा वापरण्याचे नाविन्यपूर्ण प्रकार

आपल्यापैकी अनेक कुटुंब घरगुती RO वॉटर प्युरिफायर हे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरत असतील. ह्या प्रकियेद्वारे खराब पाणी बाहेर टाकले जाते. हे पाणी आपण वापरात नाही. हे पाणी वाया जाते म्हणजेच आपण पाण्याचा अपव्यय करतो असे म्हणायला हरकत नसावी. मग आपण RO वॉटर प्युरिफायर वापरणं बंद करावे का? किंवा वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करावा का? 

खरं पाहायला गेले तर  पाणी शुद्धीकरणाच्या विविध पद्धतींपैकी सर्वात विश्वसनीय पद्धत म्हणजे Reverse Osmosis (RO) आणि पाण्यात असलेल्या जास्तीच्या TDS मुळे आणि अनेक दूषितांमुळे RO वापरण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

जर मी  सांगितले कि तुम्ही पाणी शुद्धीकरणासाठी अतिशय विश्वसनीय RO पद्धत वापरू शकता ते हि वाया जाणाऱ्या पाण्याची चिंता न करता तर तुमची प्रतिक्रिया काय असेल??? तर ह्यासाठी पाण्याचा अपव्यय न होऊ देता हे पाणी पुन्हा वापरण्याचे काही नाविन्यपूर्ण प्रकार आपल्याला ज्ञात असावे. RO waste water uses

RO चे वाया जाणारे पाणी वापरण्याआधी सावधानता बाळगण्याच्या काही गोष्टी:

पाणी परत वापरण्याआधी त्या पाण्याचा TDS किती आहे हे पाहणे गरजेचे आहे. जर पाण्याचा TDS अतिउच्च असेल तर ते पाणी पुन्हा न वापरणे योग्य ठरेल.

(RO waste water uses) RO प्रकियेमुळे वाया जाणारे पाणी पुन्हा वापरण्याचे नाविन्यपूर्ण प्रकार

आपली चारचाकी/दुचाकी धुणे

दुचाकी आणि चारचाकी धुण्यासाठी RO च्या वाया जाणाऱ्या पाण्याचा आपण वापर करू शकता पण ह्या पाण्याचा TDS हा १२००-१५०० ppm पेक्षा जास्त नसावा.

परसबागेतील झाडांना पाणी वापरणे.

आपण घरात, गच्चीवर, सज्जावर (Balcony) तसेच परसबागेत लावलेली रोपे किंवा झाडे ह्यांना RO च्या वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर करावा पण ह्या पाण्याचा TDS कमी असावा. 

सुरक्षित बाजूने विचार केला असता आपण ह्या पाण्याची सुरुवात मोजक्या रोपांपासून करावी. RO चे वाया जाणारे पाणी ज्या रोपांना आपण देतोय त्या रोपांचे निरीक्षण १५ ते २० दिवस करावे. ह्या काळात रोपाची वाढ खुंटली असेल तर त्या रोपाला हे पाणी देऊ नये. तसे २१०० ppm TDS असलेले पाणी रोपांना सुरक्षित असते. पण पाण्यात सोडियम, मॅग्नेशियम चे प्रमाण ६०% पेक्षा कमी असावे लागते.

भांडे धुण्यासाठी

भांडे धुण्यासाठी RO च्या वाया जाणाऱ्या पाण्याचा आपण वापर करू शकता पण ह्या पाण्याचा TDS हा २००० ppm पेक्षा जास्त नसावा. 

फरशी पुसण्यासाठी

फरशी पुसण्यासाठी RO च्या वाया जाणाऱ्या पाण्याचा आपण वापर करू शकता पण ह्या पाण्याचा TDS हा २००० ppm पेक्षा जास्त नसावा.

Toilet आणि Bathroom साफ करण्यासाठी

Toilet आणि Bathroom साफ करण्यासाठी RO च्या वाया जाणाऱ्या पाण्याचा आपण वापर करू शकता पण ह्या पाण्याचा TDS हा ३००० ppm पेक्षा जास्त नसावा. 

अनेक भागांमध्ये पाण्यासाठी अनेक कुटुंबांना पायपीट करून काही किलोमीटर लांबून पाणी आणावे लागते तसेच पाण्याअभावी शेतातील पिकांचे नुकसान होणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अश्या अनेक बातम्या आपण दरवर्षी वाचत आणि बघत असतो. आपल्याला पुरेशा पाण्याचा पुरवठा होत असल्याने आपण भाग्यवान आहोत पण तरीही आपण पाणी वाचवण्याला हातभार लावला पाहिजे. वरील अनेक पद्धतींनी आपण पाणी वाचवू शकतो (RO waste water uses) आणि अश्या अनेक लहान लहान उपायातून पाणी वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.