Skip to content

Water Purifier निवडण्याच्या चुका (Mistake) : योग्य निवडताना हे तोटे टाळा

Water Purifier कसे निवडावे ?

Water Purifier कसे निवडावे ?

बाजारात अनेक प्रकारचे Water Purifier उपलब्ध आहेत पण नेमके कोणत्या प्रकारचे प्युरिफायर  विकत घ्यावे ह्याबद्दल अनेक संभ्रम निर्माण होतात. पिण्याच्या पाण्यावर आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या प्रकृतीचे आणि स्वास्थ्याचे समीकरण अवलंबून असते. ह्या पोस्ट चा उद्देश आहे कि आपल्या घरातील Water Purifier कोणत्या वैशिष्ट्याने परिपूर्ण असावे आपल्या ह्या पोस्ट मध्ये आपण Water Purifier चे तांत्रिक विश्लेषण करणे हा सर्वात महत्वाचा हेतू आहे

आपल्या पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करणे

सर्वप्रथम आपण सध्या जे पाणी वापरात आहोत त्याचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. हे मूल्यांकन करताना विचारात घेण्याचे मुद्दे 

1. पाण्याचा स्रोत 

 2. पाण्याची गुणवत्ता 

 3. पाण्यातील भौतिक दूषिते

 4. पाण्यातील जैविक दूषिते

 5. पाण्यातील रासायनिक दूषिते

पाण्याचा स्रोत

आपण पिण्यासाठी वापरात असलेल्या पाण्याचा स्रोत कोणता आहे ह्याचे विश्लेषण करावे. उदाहरणार्थ पाण्याचे स्रोत पुढील प्रमाणे : नदीचे पाणी, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इ.) माध्यमातून नळाला येणारे पाणी, जलपरी (boring), विहिरीचे पाणी इ.

पाण्याची गुणवत्ता

पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्वात महत्वाचे संज्ञा आहे TDS (Total  Dissolved Solids). तर TDS (Total  Dissolved Solids) (टीडीएस) म्हणजे काय तर एकूण विरघळलेले घन पदार्थ (टीडीएस) हे आण्विक, आयनीकृत किंवा सूक्ष्म-ग्रॅन्युलर (कोलॉइडल सोल) निलंबित स्वरूपात असलेल्या सर्व अजैविक आणि सेंद्रिय पदार्थांच्या विरघळलेल्या एकत्रित सामग्रीचे मोजमाप आहे. TDS अनेकदा भाग प्रति दशलक्ष (ppm) मध्ये मोजले जाते.

आपल्या पाण्याचा TDS कसा मोजायचा? असा प्रश्न आपणासमोर आला असेल तर TDS मोजण्यासाठी बाजारात TDS meter उपलब्ध आहेत त्याची किंमत खूपच कमी असते.

TDS मीटर बद्दल अधिक माहितीसोबतच discounted किंमत पहा  

टीडीएस मीटर द्वारे आलेल्या परिगणना (meter reading) द्वारे पाण्याची गुणवत्ता समजते

TDS स्तर (Milligram/Litre)

शेरा

५० पेक्षा कमी 

अस्वीकार्य कारण त्यात आवश्यक खनिजे नसतात

५०-१५०

पिण्यासाठी स्वीकार्य. सांडपाणी किंवा औद्योगिक कचर्‍यामुळे पाणी प्रदूषित झालेल्या भागांसाठी टीडीएस पातळी आदर्श आहे

१५०-३५०

चांगले. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग असलेल्या लोकांसाठी पाणी आदर्श आहे

३५०-५००

स्वीकार्य

५०० पेक्षा जास्त 

अस्वीकार्य

 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, पाण्यात TDS पातळीची वरची मर्यादा 500 ppm आहे. डब्ल्यूएचओने शिफारस केलेली टीडीएस पातळी मात्र ३०० पीपीएम आहे

 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS चा रिपोर्ट खालील लिंक वर जाऊन बघू शकतात 

PM/ 10500/ 1 October 2020

पाण्यातील भौतिक दूषिते

पाण्यात आढळणारी माती हे भौतिक दूषिताचे सर्वात महत्वाचे उदाहरण आहे. तसेच गाळ आणि इतर घाण पदार्थांचे कण ह्यांचा समावेश भौतिक दूषितांमध्ये होत असतो.

पाण्यातील जैविक दूषिते

जैविक दूषिते हि पाण्यात आढळणारी सर्वात  धोकादायक दूषिते मानली जातात. ह्यामध्ये जिवाणू (बॅक्टरीया), विषाणू (व्हायरस), प्रोटोझोव्हा,  परजीवी (प्यारासाइट्स) इ. चा समावेश होतो.

पाण्यातील रासायनिक दूषिते

पाण्यात अत्यंत धोकादायक असे रासायनिक घटक  असतात त्यांना आपण TDS म्हणजेच Total Dissolved Solids असे संबोधतो. खरे तर भौतिक दूषितांचाही समावेश TDS मध्ये होतो

Water Purifier चे प्रकार

Water Purifier चे मुख्यतः ५ प्रकार पडतात 

१. UV Water Purifier

२. RO + UV Water Purifier

३. RO + UV + UF Water Purifier

४. RO + UV + Minerals Water Purifier

५. RO + UV + Alkaline Water Purifier

पाणी शुद्ध करण्यासाठीच्या प्रक्रियासाठी जे पार्टस Water Purifier मध्ये वापरले जातात त्यांचे कार्य पुढील प्रमाणे

प्रकियेसाठी वापरला जाणारा भाग (Part ) 

प्रकियेचे परिणाम 

Pre-Filter

डोळ्यांनी दिसणारी  घाण  व  माती  तसेच   पाण्यातील गढूळपणा  काढला  जातो 

In-Line Sediment

डोळ्यांना न दिसणारे  अतिसूक्ष्म  धुळीचे  कण, जैविक घटक,  पाण्यातील विषारी  घटक  वेगळे करते 

In-Line Carbon

दातांना व हाडांना  हानिकारक असलेले अतिरिक्त फ्लोराईड चे प्रमाण कमी करते  तसेच  पाण्यातील  सूक्ष्म कण, केमिकल्स , क्लोरीन सारखे अनावश्यक घटक कमी करते.  

R.O. (Reverse Osmosis)  Membrane

हा सर्वात महत्वाचा फिल्टर आहे ह्याची सूक्ष्म छिद्रे म्हणजेच  0.001mm म्हणजेच एक मायक्रॉन (केसाच्या जाडीचा एक लाखावा भाग) इतका असतो यातून फक्त शुद्ध पाण्याचे थेम्ब पुढे जाऊ शकतात ह्यामुळे पाण्यातील असलेलले अतिजड घटक वेगळे केले जातात उदा. अर्सेनिक शिसे(Led),  कॅडमियम, फ्लोराईड लोह इ.

UV (Ultra-Violet) Technology

पाण्यातील बॅक्टरीया आणि  व्हायरस ह्यांना  निष्क्रिय करण्याचे काम करतो

Minerals Cartridge

पाणी  चवदार व मिनरल्सयुक्त बनविते. पाण्याची नैसर्गिक चव राखून ठेवते 

पाण्यात आढळणारी दूषिते आणि दूषिते काढून टाकण्यासाठीच्या Water Purifier मध्ये प्रक्रिया पुढीलप्रमाणे :

  • भौतिक दूषिते (Physical Contaminants ) : Pre-Filter, In-Line Sediment, In-Line Pre-Carbon
  • जैविक दूषिते (Biological Contaminants) :   UV (Ultra-violet) Technology 
  • रासायनिक दूषिते ( Chemical Contaminants) : R.O. Reverse Osmosis 

पाण्याचा टीडीएस 300 मिलिग्रॅम/ लिटर  किंवा त्यापेक्षा कमी असल्यास Pre-Filter, In-Line Sediment, In-Line Pre-Carbon आणि UV (Ultra-violet) Technology असलेलाच Water Purifier विकत घ्या 

पाण्याचा टीडीएस 301  ते 900 मिलिग्रॅम/ लिटर  किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास Pre-Filter, In-Line Sediment, In-Line Pre-Carbon, UV (Ultra-violet) Technology आणि  R.O. Reverse Osmosis  असलेला पण मिनरल्स कारट्रिज असलेलाच Water Purifier विकत घ्या 

टिप : फक्त R.O. असलेले प्युरिफायर खरेदी करू नका सोबत मिनरल्स कारट्रिज (खनिजतयुक्त) किंवा   alkaline कारट्रिज असलेल्या प्युरिफायर ला पसंती द्या.कारण R.O. ही प्रक्रिया मानवाच्या शरीराला हवे असलेले क्षार/ खनिजे सुद्धा पाण्यातून काढून टाकतो म्हणून मानवाच्या शरीराला हवे असलेले खनिजे परत पाण्यात मिसळण्यासाठी मिनरल्स कारट्रिज चा तसेच पाण्याचा pH वाढवण्यासाठी Alkaline कारट्रिज चा वापर करावा. 

RO + UV + Minerals वॉटर प्युरिफायर ची माहिती 

RO + UV + Alkaline वॉटर प्युरिफायर ची माहिती 

RO + UV + UF वॉटर प्युरिफायर ची माहिती