Table of Contents
Toggleतांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे 10 आरोग्यदायक फायदे
अगदी प्राचीन काळापासून आपले पूर्वज सांगत आले आहेत कि तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याने आरोग्याला खूप फायदे होतात.अजूनही बरेचशे वयस्कर व्यक्ती तांब्याच्या भांड्यात पाणी पितात तर बरेचशे तरुण लोक सध्या प्लास्टिक आणि इतर धातूंच्या भांड्यात किंवा बाटलीने पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत.
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे फायदे जाणून घेण्या आधी आपण हे जाणून घेऊ की तांबे ह्या धातूचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत.
तांबे (Copper) हा अगदी आवश्यक खनिजांपैकी एक महत्वाचा घटक आहे. तांबे हे खनिज लाल रक्त पेशी आणि collagen म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशीतील प्रथिनांचा घटक तयार करण्यास मदत करतो.आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रियेत तांब्याचा महत्वाचा वाटा असतो.
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे १० आरोग्यदायक फायदे
वजन कमी करण्यास मदत करते
तांब्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तांबे आपली पचनसंस्था सुरळीत चालण्यासाठी मदत करत असते एवढेच नाही तर तांबे आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. पहाटे तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही कमी व्यायाम करून किंवा व्यायाम न करता वजन कमी करण्याची इच्छा ठेवत असाल तर तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याची सवय लावू शकता.
जखम लवकर बरी करण्यास मदत करते.
तांबे हा धातू दाहक (inflammatory), जिवाणू तसेच विषाणू प्रतिबंधक (anti-bacterial, anti-viral) गुणधर्मीय आहे आहे. तसेच हा धातू फक्त बाहेरील जखमा नाही नाही तर शरीरांतर्गत जखमा सुद्धा बऱ्या करण्यास करण्यास मदत करतो
पचनसंस्था सुधारते.
तांब्यामध्ये जिवाणू विरोधी (anti-bacterial) गुणधर्म आहेत, म्हणून तांबे पोटातील जीवाणूंना मारण्यास कारणीभूत ठरते आणि परिणामी आपली पचनसंस्था सुधारते. संसर्ग आणि पोटातील व्रण (ulcer) यावर हा उत्कृष्ट उपाय आहे.
त्वचा निरोगी राहते.
जसे जसे आपले वय वाढत जाते तसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते आणि आपण म्हातारे दिसू लागतो. तांब्यामध्ये नैसर्गिक anti-oxidant गुणधर्म असतात परिणामी त्वचा उजळते म्हणजेच आपण तरुण दिसू लागतो. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने त्वचेशी निगडित सर्व आजार दूर होतात.
सांध्यांना आराम मिळतो.
दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर संधिवाताचा त्रास असेल तर तुमच्यासाठी तांब्याच्या पात्रातून पाणी पिणे हा एक उत्कृष्ठ उपाय ठरू शकेल.
हृदय मजबूत होते.
तांब्याच्या पात्रातील पाणी सेवन केल्याने कोलेस्टेरॉल ची पातळी नियंत्रणात राहते परिणामी हृदय मजबूत होते. तांब्याच्या पात्रातील पाणी सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयाच्या ठोक्यांचे प्रमाण हे संतुलित राहत असल्याचे अमेरिकेतील कर्करोग सोसायटी ने शोधून काढले आहे.
अशक्तपणा येत नाही.
आपल्या शरीरात जेव्हा तांब्याची पातळी कमी होते तेव्हा आपले शरीर iron शोषून घेण्यात अपयशी ठरते परिणामी शरीरात अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा टाळण्यासाठी दररोज तांब्याच्या पात्रात पाणी पिणे फायदेशीर ठरते आणि अशक्तपणा येत नाही.
थायरॉईड ग्रंथीचे काम नियमित होते.
थायरॉईड ग्रंथीचे काम नियमित ठेवण्यास तांबे हा सर्वात महत्वाचा घटक आहे.तांब्यामुळे थायरॉईल ग्रंथीचे रक्तात होणारे उत्सर्जन अतिशय प्रमाणात होते. थायरॉईड ग्रंथीचे जास्त होणारे उत्सर्जन रोखले जाते.
रक्त वाढण्यास मदत होते.
तांब्याच्या पात्रात पाणी सेवन केल्याने रक्ताची कमतरता दूर होते. ह्यामुळे हृदयाची कार्यप्रणाली मजबूत होते एवढेच नाही तर ऍनिमिया चा धोका टळतो.
कर्करोगाचा धोका टळतो.
तांब्याच्या पात्रातील पाण्यात अँटिऑक्सिडंट पर्याप्त प्रमाणात असतात, जे कर्करोगाशी लढण्यास सहाय्यक ठरतात त्यामुळे कर्करोगाचा धोका टळतो.
Alkaline (अल्कधर्मी ) पाणी म्हणजे काय? आणि त्याबद्दल तज्ज्ञांचे मत काय? हे जाणून घेण्यासाठी नक्कीच लेख वाचा.