Skip to content

वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ?

वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ?

तुम्ही कधी ऐकले असेल, दिवसाला ८ पेले (Glass) पाणी पिण्याचे प्रयोजन असले पाहिजे. 

 

The Institute of Medicine च्या शिफारसीनुसार दिवसाला प्रौढ पुरुषांनी कमीत कमी १०१ औन्स (२९८६.९३ मिलीलिटर), तर प्रौढ महिलांनी दिवसाला कमीत कमी ७४ औंस (२१८८.४४ मिलीलिटर) पाणी प्यायला हवे. पण तरीही आपण दिवसाला किती पाणी प्यायला हवे ह्याचे योग्य उत्तर शोधणे वाटते तेवढे सोपे नक्कीच नाहीये. 

आपल्या शरीरात ६०% पाणी आहे. शरीरातील प्रत्येक प्रणाली कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच आपण किती पाणी प्यावे ह्याची शिफारस ही आपल्या वयानुसार, लिंगानुसार, काम करण्याच्या पद्धतीनुसार किंवा वस्तुस्थितीनुसार (गर्भधारणा किंवा स्तनपान) ठरत असते.

वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ?

प्रौढ पुरुष:

The Institute of Medicine च्या सध्याच्या शिफारसीनुसार प्रौढ पुरुष म्हणजेच वयवर्षे १९ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांनी जवळपास १३१ औंस (३८७४.१३२४ ml) म्हणजेच जवळपास साडेतीन ते चार लिटर पाणी प्यायला पाहिजे. 

प्रौढ महिला:

The Institute of Medicine च्या सध्याच्या शिफारसीनुसार प्रौढ महिला म्हणजेच वयवर्षे १९ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांनी जवळपास ९५ औंस (२८०९.२८५३ ml) म्हणजेच जवळपास तीन लिटर पाणी प्यायला पाहिजे. 

 

हि शिफारस तुम्ही दिवसभर घेतलेल्या संपूर्ण द्रवपदार्थात संदर्भित केलेली आहे, ह्यामध्ये तुम्ही खाल्लेल्या किंवा प्यायलेल्या सर्व पदार्थांचा समावेश होतो ज्यामध्ये पाण्याची मात्रा असते जसे की, फळे, पालेभाज्या ई. 

मुले:

मुलांसाठीच्या शिफारसीत मुलांच्या वयाचा सर्वात जास्त वाटा असतो. मुले व मुली ज्यांचे वय ४ ते ८ वर्ष आहे त्यांनी दिवसाला ४० औंस (११८२.९४ ml) म्हणजेच एक ते दीड लिटर पाणी पिणे आवश्यक असते. मुले व मुली ज्यांचे वय ९ ते १३ वर्ष आहे त्यांनी दिवसाला ५६ ते ६४ औंस (१६५६ ml- १८९२ml) म्हणजेच दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. मुले व मुली ज्यांचे वय १४ ते १८ वर्ष आहे त्यांनी दिवसाला ६४-८८ औंस (१८९२ ml-२६०२ ml) म्हणजेच दोन ते अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक असते. 

महिला पुनरुत्पादन वय (Reproductive Age):

जर महिला गर्भधारित किंवा स्तनपान देणारी असेल तर शिफारसीत बदल करण्यात आला आहे. गर्भधारित महिलांनी कमीत कमी ८० औंस (२३६५.८८ ml) म्हणजेच जवळपास अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक असते तसेच महिला जर स्तनपान देणारी असेल तर तिने कमीत कमी १०४ औंस (३०७५ ml) म्हणजेच तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. 

वयोमानानुसार दिवसाला किती पाणी पिणे योग्य ? अन्य विचारार्ह गोष्टी:

जर तुम्ही उष्ण हवामानाच्या प्रदेशात राहत असाल किंवा दररोज व्यायाम करत असाल किंवा तुम्हाला ताप, अतिसार म्हणजेच Diarrhea झाला असेल तर तुम्ही जास्त पाणी पिणे गरजेचे ठरेल. तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर दिलेल्या शिफारशीपेक्षा 2 ग्लास म्हणजेच जवळपास अर्धा लिटर पाणी जास्त पिणे आवश्यक आहे.

जर तुम्ही समुद्रपातळीपेक्षा ८००० फूट  जास्त उंचावर राहत असाल तर तुम्हाला शिफारशीपेक्षा अर्धा लिटर पाणी जास्त पिणे आवश्यक असेल.

योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसेच कमी पाणी पिण्याने काय होते हे जाणून घ्या.

Alkaline (अल्कधर्मी) पाणी म्हणजे काय? आणि तज्ज्ञ ह्यावर काय म्हणतात जाणून घ्या.