Table of Contents
ToggleReverse Osmosis Process म्हणजे काय ?
R.O. Reverse Osmosis (उलट द्रवभिसरण)
व्याख्या : पिण्याच्या पाण्यातून नको असलेले विदुतभारीत कण (ion), रेणू (molecule), तसेच मोठे कण (Particles) अंशतः पारगम्य पडद्याच्या (partially permiable membrane) साहाय्याने काढून टाकण्याच्या प्रक्रियेला R.O. उलट द्रवभिसरण (Reverse Osmosis) असे म्हणतात.
आपण ह्या आधीच्या लेखात (खरंच वॉटर प्युरिफायरची गरज आहे का?) पाण्यात असलेल्या दूषितांबद्दल वाचले आहे. त्यानुसार पाण्यात ३ प्रकारची दूषिते (contaminants/Impurities) आढळतात त्यातील काही प्रमाणातील भौतिक आणि रासायनिक दूषिते काढण्यासाठी R.O. चा उपयोग केला जातो.
Reverse Osmosis Process आकृती

Reverse Osmosis Process प्रक्रिया
प्रक्रिया: नळाचे, बोअरवेल, विहिरीचे पाणी हे आपल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. हे पाणी R.O. membrane म्हणजेच अंशतः पारगम्य पडद्याच्या मधून जाण्यासाठी उच्च दाब असणे गरजेचे आहे म्हणून उच्च दाबाच्या पंपाने (Booster/High Pressure Pump) पाण्याला उच्च दबावाने membrane पर्यंत पोहचवण्यात येते. Membrane मध्ये असलेल्या अतिसूक्ष्म छिद्रातून फक्त शुद्ध पाणी पुढे येते आणि पाण्यातील भौतिक (Physical) आणि रासायनिक दूषिते (Chemical Contaminanats) पुढे येण्यापासून रोखली जातात.
Reverse Osmosis Process उलट द्रवाभिसरण प्रक्रियेचे पाणी शरीरासाठी योग्य कि अयोग्य ?
R.O. (Reverse Osmosis Process) उलट द्रवाभिसरण प्रक्रियेचे पाणी शरीरासाठी योग्य कि अयोग्य ?
घरातील पिण्याचे पाणी शुद्धीकरणाची सर्वात विश्वसनीय पद्धत म्हणजे उलट द्रवभिसरण म्हणजेच Reverse Osmosis (R.O.). ह्याचे कारण असे की हि प्रक्रीया पाण्यातील दूषिते (Contaminants) काढून टाकते.
काही समीक्षक असा दावा करत आहेत की R.O. पद्धतीने शुद्ध केलेले पाणी आपल्या शरीराला अतिशय घातक आहे आणि त्याची कारणे…..
- R.O. पाण्यातील सर्व आवश्यक घटक खनिजे (Minerals) काढून टाकतो.
- R.O. पाण्याची pH Level कमी करतो.
Reverse Osmosis Process पाण्यातील 80-90% आवश्यक घटक खनिजे (Minerals) काढून टाकतो?
R.O. शुद्धीकरण प्रक्रियेत फक्त दूषिते नाही तर त्यासोबत धोकादायक जड धातू जसे की अर्सेनिक, शिसे (Led), पारा (Mercury) आणि पाण्यातील महत्वाचे घटक असलेली खनिजे (मिनरल्स) कॅल्शियम आणि मॅग्नेशियम काढून टाकतो. ह्याला कारण असे कि ह्या गरज असलेल्या खनिजांच्या रेणूचा आकार हा अंशतः पारगम्य पडद्यामध्ये (Partially Permiable Membrane) असलेल्या सूक्ष्म छिद्रांपेक्षा मोठा असतो.
ह्या सर्वज्ञात असलेल्या वस्तुस्थिती मुळे काही समीक्षक दावा करत आहेत की पाण्यातील आवश्यक असलेले घटक R.O. ह्या प्रकियेमध्ये काढले जातात म्हणून R.O. प्रक्रियेचे पाणी शरीरासाठी हानिकारक आहे.
आपण ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे शरीराला गरजेची आहेत आणि ह्या गरजेच्या असलेल्या खनिजांना R.O. ह्या प्रकियेमुळे पाण्यातून काढले जाते.
पण हे पण तितकच खरं आहे कि R.O. पेक्षा प्रभावी आणि विस्तृत प्रमाणात वापरली जाणारी दुसरी पद्धत नाही.
हे सत्य जाणून सुद्धा कोणतीही चिंता न करता आपण R.O.प्रकियेद्वारे शुद्ध केलेलं पाणी पिऊ शकतो का? ह्याबद्दल ह्याच लेखाच्या शेवटी आपण ह्यावरील उपायाबद्दलही निरनिराळ्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत. त्याआधी आपण R.O. पद्धत कशी घातक आहे ह्याच्या दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करू.
Reverse Osmosis Process पाण्याची pH Level कमी करतो ?
R.O. प्रक्रियेच्यावेळी पाणी जेव्हा अंशतः पारगम्य पडद्यामध्ये (Partially Permiable Membrane) असलेल्या सूक्ष्म छिद्रांमधून पुढे जात असते तेव्हा अनेक जैविक आणि अजैविक घटक ह्यातून पुढे जाण्यात अयशस्वी होतात पण वायुरूपी अनेक वायू जसे की कार्बनडायऑक्साइड (CO2) membrane मधून पुढे जाण्यात यशस्वी होतात. हा कार्बनडायऑक्साइड(CO2) पुढे हायड्रोक्साइड(OH-)च्या विद्युतभारित कणाबरोबर एकत्र येऊन हायड्रोजनकार्बोनेट किंवा बायकार्बोनेट (HCO3) हा अम्लीक (acidic) स्वरूप बनवतो. ह्याचा परिणाम म्हणजे कार्बनडायऑक्साइड (CO2)चे प्रमाण जितके जास्त तेवढा पाण्याचा pH कमी असतो. म्हणजेच पाणी आम्लयुक्त (acidic) होत जाते
तथापि मानवी शरीर आपल्या शरीराचा pH हा उदासीन (neutral) ठेवण्याचं कठीण काम छान पद्धतीने करत असते जेव्हा तुम्ही हे आम्लयुक्त (acidic) पाणी पितात तेव्हा त्याचा आम्लपणा (acidic nature) तुमच्या तोंडातील लाळेत तसेच पोटातील अन्नात सोडत असते.
जर तुम्हाला कोणताही आजार असेल किंवा तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही असे आम्लयुक्त (acidic) पाणी पिणे बंद केले पाहिजे तुमच्या शरीरातला pH संतुलित (Balance) ठेवण्यासाठी अल्कधर्मी पाणी (alkaline Water) पिणे गरजेचे ठरते.
Reverse Osmosis Process नंतर पाण्याचा किमान TDS किती असावा ?
जगातील भारतासह अनेक देशांनी पाण्यातील स्वीकाहार्य जैविक आणि अजैविक घटकांची कमाल मर्यादा स्पष्ट केलेली आहे. पण खूप कमी देशांनी किमान मर्यादा स्पष्ट केलेली आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) नुसार, पाण्यात TDS पातळीची वरची मर्यादा 500 ppm आहे. डब्ल्यूएचओने शिफारस केलेली टीडीएस पातळी मात्र ३०० पीपीएम आहे
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS चा रिपोर्ट खालील लिंक वर जाऊन बघू शकतात
तथापि आपल्या प्राचीन वेदांनी पाण्यातील खनिजांचे महत्व हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहे.
ऋग्वेदात नीतिमान पिण्याच्या पाण्याचे गुणधर्म केलेले वर्णन.
“ शिथम (स्पर्श करण्यासाठी थंड), सुशी: (शुद्ध), सिवम (खनिजयुक्त/ पौष्टिक मूल्य असलेले), इस्थम (पारदर्शक), विमलम लहू षड्गुणम (सरासरीने आम्ल संतुलित असलेले).
WHO (World Health Organisation ) म्हणजेच विश्व स्वास्थ्य संस्था (विस्वासं) ने सन 1980 ला दिलेला अहवाल
खाली दिलेल्या संकेतस्थळावरून (लिंक) वरून तुम्ही WHO (World Health Organisation ) म्हणजेच विश्व स्वास्थ्य संस्था (विस्वासं) ने सन 1980 ला दिलेला अहवाल पाहू शकतात.
https://www.who.int/water_sanitation_health/dwq/nutrientschap12.pdf
वरील प्रकाशित केलेल्या अहवालानुसार किमान टीडीएस हा ६० मिलिग्रॅम/लिटर आणि कमाल टीडीएस हा ५०० मिलिग्रॅम/लिटर दिलेला आहे. २५ ते ५० टीडीएस असलेले पाणी हे बेचव मानले जाते.
अहवालानुसार पाण्यातील कॅल्शियमचे प्रमाण हे ३० मिलिग्रॅम/ लिटर असावे आणि मॅग्नेशियमचे इष्टमम प्रमाण १० मिलिग्रॅम/ लिटर असावे.
Reverse Osmosis Process चे पाणी आपण पुन्हा खनिजयुक्त (Re-mineralise ) करू शकतो का?
जर तुम्ही आधीपासूनच खनिजयुक्त (Mineral) कार्ट्रिज शिवाय R.O. प्युरिफायर वापरत आहात……
जर तुमच्या शुद्ध झालेल्या पाण्याचा टीडीएस ५० मिलिग्रॅम/ लिटर किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही आपल्या प्युरिफायर मधील UV (Ultra-Violet) चेम्बर नंतर मिनरल कारट्रिज बसवू शकता. हे काम तुम्ही घरी स्वतः किंवा जवळच्या प्युरिफायर व्यावसायिकाकडून करून घेऊ शकता.
खनिजयुक्त कारट्रिज हे शरीराला आवश्यक असणारे खनिजे म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोट्याशियम पाण्यात मिसळतो.
जर तुम्ही नवीन प्युरिफायर विकत घ्यायच्या विचारात असाल…….तर आपल्या पाण्याच्या स्रोतांनुसार आणि कोणत्या पाणी शुद्ध करण्याच्या प्रकियांनुसार तसेच पाण्याच्या टीडीएस नुसार कसे प्युरिफायर निवडावे ते समजून घेण्यासाठी नक्की वाचा पुढील लेख. ह्या लेखाचे संकेतस्थळ ( लिंक) खाली दिलेली आहे.
Water Purifier कसे निवडावे ह्यासंदर्भीत माहितीसाठी क्लिक करा.
टिप : फक्त R.O. असलेले प्युरिफायर खरेदी करू नका सोबत मिनरल्स कारट्रिज (खनिजतयुक्त) किंवा alkaline कारट्रिज असलेल्या प्युरिफायरला पसंती द्या. कारण R.O. ही प्रक्रिया मानवाच्या शरीराला हवे असलेले क्षार/खनिजे सुद्धा पाण्यातून काढून टाकतो म्हणून मानवाच्या शरीराला हवे असलेले खनिजे परत पाण्यात मिसळण्यासाठी मिनरल्स कारट्रिज चा तसेच पाण्याचा pH वाढवण्यासाठी Alkaline कारट्रिज चा वापर करावा.