Skip to content

RO Membrane आणि इतर फिल्टर्स कधी बदलावे ?

When to change RO Membrane and other Filters?

तुम्ही जर RO (Reverse Osmosis) वॉटर प्युरिफायर वापरत असाल तर आपणांस RO membrane आणि इतर फिल्टर्स किती कालावधीनंतर किंवा किती लिटर पाणी शुद्ध केल्यानंतर बदलले पाहिजे किंवा  देखभाल किती दिवसांनी केली पाहिजे ह्याची माहिती असणे गरजेचे आहे.

 

आपल्या प्युरिफायर मधून १०० % शुद्ध पाणी मिळवण्यासाठी आपल्या प्युरिफायरची देखभाल (Maintenance) आणि नियोजित सेवा (Servicing) किती महत्वाचे आहे हे समजून घेण्याचा ह्या लेखाचा हेतू आहे.

 

RO वॉटर प्युरिफायरच्या देखभालीचा (Maintenance)चा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा सर्वप्रथम प्री-फिल्टर किंवा प्राथमिक फिल्टर म्हणजेच Spun Filter बदलण्याचा विचार सर्वप्रथम येत असतो. पण इतर फिल्टर सुद्धा आपले कार्य योग्य पद्धतीने करत आहेत की नाही हे तपासणे तितकेच महत्वाचे ठरते.

फिल्टर्स बदलण्याचा नियतकालिक वेळापत्रक (Periodic Schedule) कसा असतो ?

सर्व फिल्टर्स बदलण्याचा नियतकालिक वेळापत्रक (Periodic Schedule) कसा असतो ह्याची माहिती आपणास असणे तसेच प्रत्येक फिल्टरचा नेमका हेतू काय आहे ह्याचा अभ्यास आपणास असणेही तितकेच महत्वाचे आहे. फिल्टर कार्य कश्या पद्धतीने करते ह्याची माहिती असलीच पाहिजे असे मुळीच गरजेचे नाही.

 

फिल्टर आणि RO Membrane हे मह्त्वाचे भाग आहेत आणि हे बदलणे म्हणजेच संपूर्ण देखभालीच्या ८०% खर्चात मांडले जाते पण ह्यामुळे १००% शुद्ध पाण्याची हमी मिळते. 

 

 

 

 ह्या लेखातील माहिती तुम्हाला पुढील मुद्द्यांची मदत करेल:

  1. देखभाल खर्च (Maintenance Cost) कमी करण्यासाठी 

  2. प्युरिफायरचे आयुष्य वाढवण्यासाठी 

  3. १००% निर्मळ आणि शुद्ध पाणी मिळवण्यासाठी 

  4. अनैतिक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी 

 पुढील परिच्छेदात एका सरासरी भारतीय कुटुंबाच्या म्हणजे ४-६ व्यक्तींच्या कुटुंबाच्या प्युरिफायरचे फिल्टर आणि RO membrane बदलण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करणार आहोत. ह्यामध्ये पुढील फिल्टर्सचा विचार करणार आहोत. 

 

  • प्राथमिक फिल्टर – Spun फिल्टर 

  • Sediment फिल्टर 

  • Carbon फिल्टर 

  • RO Membrane 

प्राथमिक फिल्टर - Spun फिल्टर 

प्राथमिक फिल्टर जे प्युरिफायरच्या बाहेर बसवले जाते. प्राथमिक फिल्टर हे प्रत्येक ३ महिन्यांनी बदलले पाहिजे. पाण्याचा वापर जास्त असेल किंवा पाण्यात मातीचा अंश किंवा भौतिक दूषिते (Physical Contaminants) जास्त असतील तर हे Spun फिल्टर प्रत्येक २ महिन्यांनी बदलणे सुद्धा योग्य ठरते

Sediment फिल्टर

गाळ आणि घाण काढून टाकण्यासाठी sediment फिल्टरची रचना केलेली असते. जेणेकरून पुढील Carbon फिल्टर आणि RO Membrane बंदिस्त (Blocked) होऊ नये. 

RO (Reverse Osmosis) प्रणालीमध्ये पाण्याला जास्तीत जास्त दाबाने RO Membrane पर्यंत पोहचणे गरजेचे असते. गाळ आणि घाण पाण्यातून काढून टाकल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहतो त्यामुळे जास्तीत जास्त दाबाने पाणी RO Membrane पर्यंत पोहचण्यास मदत होते आणि ह्याचा परिणाम म्हणजे RO Membraneचे आयुष्य वाढते. Sediment फिल्टरची किंमत हि RO Membraneच्या किंमतीच्या फक्त १५% असते म्हणून आम्ही Sediment फिल्टर वेळेवर बदलण्याची शिफारस करतो

Sediment फिल्टर वेळेवर बदलले नाही तर गाळ आणि घाण RO Membrane पर्यंत पोचते आणि त्यामुळे RO Membrane हा ब्लॉक होतो. परिणामी  शुद्धीकरणाची क्षमता कमी होते. 

 
आपण जितकी sediment फिल्टरची आणि Spun फिल्टरची  तेवढे Carbon फिल्टर आणि RO Membrane चे आयुष्य वाढते.

 

Sediment Filter कमीत कमी वर्षातून एकदा बदलावे अशी आम्ही शिफारस करतो.

Carbon फिल्टर 

पाणी sediment फिल्टर मधून Carbon फिल्टर म्हणजेच Activated Carbon Filter मध्ये पोहचते. Activated Carbon Filter पाण्यातील क्लोरीन आणि इतर सेंद्रिय दूषिते (Chemical Contaminants) काढून टाकतो. तसेच पाण्याचा दुर्गंध आणि वाईट चव बदलून टाकतो. हि दूषिते निघून गेल्याने RO Membraneचे आयुष्य वाढते.

Carbon Filter कमीत कमी वर्षातून एकदा बदलावे अशी आम्ही शिफारस करतो.

RO Membrane

कोणत्याही RO वॉटर प्युरिफायरचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे RO Membrane. प्राथमिक Spun फिल्टर, Sediment फिल्टर आणि Carbon फिल्टर हे पाण्याला RO Membraneच्या कार्यप्रणालीला तणावमुक्त करत असते. ज्याचा फायदा RO Membraneच्या आयुष्य वाढीसाठी होत असतो. 

 

RO Membrane प्रणाली कशी कार्य करते हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा. 

 

आपण जर Sediment आणि Carbon फिल्टरची योग्य काळजी घेतली आणि त्यांना नियत्कालिन वेळापत्रकानुसार बदलले तर आपण RO Membrane हा ४००० ते ६००० लिटर पाणी शुद्धीकरणानंतर बदलावा लागेल. 

आपल्या वॉटर प्युरिफायरच्या RO Membrane चे आयुष्य किती दिवस असेल  हे सर्वस्वी आपल्या पाण्याच्या तसेच पाण्याच्या TDS वर अवलंबून असते. 

RO Membrane हा २ ते ३ वर्ष टिकू शकतो. RO Membrane ची कार्यक्षमता कमी झाली तर त्याचा परिणामी पाण्याची चव बदलायला लागते. RO Membrane कार्य करत नाही ह्याचा अर्थ पाण्याचा TDS वाढलेला असतो आणि हे अगदी अचानकपणे घडते त्यामुळे आम्ही RO Membrane हे २-३ वर्षात बदलण्याची शिफारस करतो.

RO Membrane कमीत कमी २-३ वर्षातून बदलावे अशी आम्ही शिफारस करतो.

वरील सर्व पार्टस माफक दरात मिळवण्यासाठी संपर्क साधा. 

 

वॉटर प्युरिफायर कसे निवडावे ह्या बद्दलचा लेख वाचण्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करा.