Skip to content

save Water in Daily life up to 15 Liters (दररोज पाणी कसे वाचवावे?)

save Water in Daily life (दररोज पाणी कसे वाचवावे?)

पाणी हेच जीवन आहे आणि आपल्याला नेहमी सांगीतले जाते “पाणी आडवा, पाणी जिरवा” तसेच “पाण्याचा अपव्यय टाळा” आपल्याला शासनाकडून आवाहन केले जाते पण आपण त्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपण सर्वानी ह्या गोष्टी अतिशय गंभीरतेने घेतल्या पाहिजे.

आपण रोजच्या दिनक्रमातसुद्धा पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू शकतो (we can save water in daily life). पाण्याचा एक एक थेम्ब ह्या पृथ्वीतलावर अतिशय महत्वाचा आहे. दररोजच्या नित्यक्रमात पाणी वाचवून आपण ह्या पृथ्वीच्या समृद्धीसाठी खारीचा वाटा उचलू शकतो

पाण्याचा जाणीवपूर्वक वापराची सवय आणि आयुष्यातील किरकोळ बदल घडवून आपण हजारो लिटर पाणी वाचवू शकतो. गांधीजींनी म्हटले आहे, “संपूर्ण जगात जो बदल घडण्याची तुमची इच्छा असेल तो बदल सर्वप्रथम स्वतः मध्ये घडवा” चला तर मग गांधीजींना स्मरून बघूया दररोज आपण थोडे थोडे पाणी कसे वाचवू शकतो.

Innovative ideas to save water in daily life दररोज वाया जाणारे पाणी कसे वापरू शकतो ह्याचे नाविन्यपूर्ण प्रकार

  • पाण्याची गळती होत असलेले नळ दुरुस्त करा: एका नळातून काही नियमित कालावधीने थेंब थेंब पाणी गळत असेल तर दिवसभरातून त्या नादुरुस्त नळाद्वारे कित्येक लिटर पाणी वाया जात असते म्हणून पाण्याची गळती होत असलेले सर्व नळ दुरुस्त करा. 
  • अंघोळ करताना पाणी कमी वापरा.:-अंघोळ करत असताना दररोज घेत असलेल्या पाण्यापेक्षा २ मग पाणी कमी घ्या. ह्याची सवय कुटुंबातील सर्वांनी लावली तर दिवसाला अनेक लिटर पाणी वाचेल.
  • RT (ऍडव्हान्स रिकव्हरी टेकनॉलॉजि) असलेले वॉटर प्युरिफायर बसवा.:-पाण्याचे शुद्धीकरण आणि पाणी वाचवणे ह्या दोन्ही गोष्टी खात्रीदायक होण्यासाठी तुम्ही असे वॉटर प्युरीफायर बसवा जे जास्तीत जास्त पाणी पुनर्प्राप्त करू शकेल.
वॉटर प्युरिफायर कसे निवडावे ह्या बद्दलचा लेख वाचण्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • ब्रश करताना नळ बंद ठेवा.:-बऱ्याच वेळा ब्रश करताना आपण नळ सुरु ठेवतो तेव्हा बरेच पाणी विनाकारण वाया जात असते ते पाणी वाचवण्यासाठी ब्रश करताना नळ बंद ठेवावा.
  • दाढी करताना बेसिनचा नळ बंद ठेवा.:-बऱ्याच वेळा दाढी करताना आपण नळ सुरु ठेवतो तेव्हा बरेच पाणी विनाकारण वाया जात असते ते पाणी वाचवण्यासाठी दाढी करताना नळ बंद ठेवावा. 
  • भाजीपाला धुताना नळाचा वापर करणे टाळा.:-आपण भाजीपाला नळाखाली धरून धुत असाल तर तसे न करता एका पात्रात पाणी घेऊन त्या पात्रात भाजीपाला धुतला तर खूप प्रमाणात पाणी वाचेल. 
  • तापमान थंड असताना झाडांना पाणी द्या: बाष्पीभवन कमी करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी तापमान थंड असताना तुमच्या लॉनला आणि बागेला पाणी द्या.
  • रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन द्या: काही देशांमध्ये, 1,500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सर्व इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्र बसवण्याची किंमत जास्त आहे, परंतु भविष्यासाठी पाण्याच्या बिलावर बचत केलेल्या रकमेची तुलना करताना, हा खर्च स्वस्त आहे किंवा काहीच नाही.
  • पाणी संवर्धनास प्रोत्साहन द्या: मित्र आणि शेजारी यांच्यासोबत पाणी संवर्धनाच्या टिप्स शेअर करा. तुमच्या अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन किंवा RWA ला तुमच्या शेजारच्या मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये जलसंवर्धन विकसित करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित करा.

राज्य आणि भारत केंद्र सरकार द्वारा जलसंधारणाचे राबवण्यात आलेले उपक्रम

केंद्र सरकारद्वारे जलसंधारणाचे उपक्रम सातत्याने हाती घेतले जातात आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS), अटल भुजल योजना, प्रधानमंत्री सिंचाई योजना (PMKSY), अटल मिशन फॉर रिजुवनेशन यासारख्या विविध योजना आणि कार्यक्रमांतर्गत समाविष्ट केले जातात. आणि शहरी परिवर्तन (AMRUT), दिल्लीचे युनिफाइड बिल्डिंग उपविधी (UBBL), 2016, मॉडेल बिल्डिंग उपविधी (MBBL), 2016, नागरी आणि प्रादेशिक विकास योजना तयार करणे आणि अंमलबजावणी (URDPFI) मार्गदर्शक तत्त्वे, 2014 इ.

देशात जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीला चालना देण्यासाठी, जलशक्ती मंत्रालयाने “पाऊस पकडा, जिथे पडतो, तिथेच पकडा” या थीमसह “जल शक्ती अभियान – पाऊस पकडा” (JSA:CTR) ही देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे.

Initiatives taken for Water Conservation

 
विचार करा दररोज फक्त एक बादली (१५ लिटर) पाणी आपण वाचवले तर महिन्याच्या ३० बादली पाणी तर वर्षाचे ३६५ बादली पाणी वाचवू म्हणजे वर्षभरातून आपण अंदाजे ५४७५ लिटर पाणी एक व्यक्ती वाचवू शकतो ह्याचा गांभीर्याने विचार केला तर आपण सर्व लोक किती पाणी वाचवू शकतो (we can Save Water  in daily life up to 5475 liters )